नाशिक : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांचे वय ८३ वर्षे असून, ते आजारी असल्याने त्यांची सांगलीहून नाशिकमध्ये येण्यासारखी परिस्थिती नसल्याने गैरहजेरी माफ करण्याची त्यांच्या वकिलांनी केलेली विनंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी मान्य केली. दरम्यान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सुरू या खटल्यास भिडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, सरकार पक्ष व महापालिका यांना नोटिसाही काढण्यात आल्या आहेत़ त्यावर शनिवारी (दि़१) जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी़ गिमेकर यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे़ नाशिकमधील आयोजित सभेत ‘आंबे खाल्ल्याने मुलं होत असल्याचे’ वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते़ संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ‘लेक लाडकी अभियान’तर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत, महापालिकेच्या आरोग्य विभागाने भिडे गुरुजी यांना नोटीस बजावली होती.
भिडे गुरुजींचे सत्र न्यायालयात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:13 AM