शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खेळाडूंना जिंकायला शिकवणारे भीष्मराज बाम यांचे निधन

By admin | Published: May 12, 2017 7:29 PM

ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ भीष्मराज बाम यांचे शुक्रवारी संध्याकाळी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 12 - खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ आणि राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक  भीष्मराज बाम यांचे शुक्रवारी संध्याकाळी नाशिकमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मानसोपचारातील भीष्म अशी उपाधी लाभलेले भीष्मराज बाम हे एका कार्यक्रमात योग विद्येसंदर्भात व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
 
बाम हे नाशिक शहरातील महात्मानगर येथे वास्तव्यास होते. येथील महात्मा सभागृहात त्यांचे शुक्रवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानात बोलत असताना ते खाली कोसळले. तातडीने त्यांना याच भागात असलेल्या सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. कुणाल गुप्ते यांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाहीे.
 
क्रीडामानसोपचार तज्ज्ञ म्हणून अवघ्या देशाला परिचित असलेल्या बाम यांनी क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह ‘द वॉल’ राहुल द्रविड या जगभरातील महान क्रिकेटपटूंसह आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनाच नव्हे तर नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत २०११-१२ या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
 
भारतातील क्रीडापटूंना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शिवधनुष्य बाम यांनी उचलले होते. बाम यांनी शासकीय खात्यातील सेवानिवृत्तीनंतर भारतीय योगशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून क्रीडामानसोपचार या विषयावर प्रभुत्व मिळविले. ‘तुमचा तुमच्यावर विश्वास हवा, स्वत:वर विश्वास असल्यास काहीही शक्य आहे’, असे ते नेहमीच सांगत असत.
 
बाम यांनी राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या नेमबाजीसंघासह मुंबई रणजी संघाचे मानसोपचार सल्लागार म्हणून काम पाहिले होते. विजयाचे मानसशास्त्र, मना सज्जना ही त्यांची पुस्तकेही गाजली होती.आज ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल केले अशा खेळाडूंपैकी अनेकांनी भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन घेतले होते. 
 
खेळाडू कितीही प्रतिभाशाली असला तरी, मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्याच्यामध्ये एक मानसिक कणखरता लागते. हाच गुण भीष्मराज बाम यांनी खेळाडूंमध्ये विकसित केला. त्यांना जिंकायला शिकवले. राहुल द्रविडचा समावेश आज यशस्वी खेळाडूंमध्ये होतो. पण हाच द्रविड 1999 साली चाचपडत असताना त्याने भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर द्रविडने कधी मागे वळून बघितले नाही. फक्त क्रिकेटपटूच नव्हे नेमबाज अंजली भागवत, धावपटू कविता राऊत यांनाही भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला.