कोरोनासारख्या महामारीने थैमान घातल्याने ग्रामविकास मंचच्या कार्यकर्त्यांनी मंदिर व परिसरातील भाग स्वच्छ केला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोनासारखी महामारी अधिक पसरू नये यासाठी गावातील प्रत्येक गल्लीत कोरोनावरील उपाययोजनेबद्दल जनजागृती केली. सिन्नर पंचायत समितीचे बालविकास अधिकारी अनिल निरगुडे यांनी जंतुनाशक औषध उपलब्ध करून दिले तर मंचचे अध्यक्ष साहेबराव साबळे यांनी स्वत:चे फवारणी यंत्र देऊन या महामारीच्या काळात स्वखर्चाने हिरीरीने भाग घेतला. यावेळी मंचचे रितेश मालाणी, सूरज वाघ, संपत ओहळ, सोमनाथ कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे, सखाहारी कुऱ्हाडे, निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ साबळे आदींनी जंतुनाशक फवारणीत परिश्रम घेतले.
फोटो ओळी- ०५ भोकणी स्प्रे
भोकणी येथे ग्रामविकास मंचच्यावतीने गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
===Photopath===
050521\05nsk_18_05052021_13.jpg
===Caption===
भोकणी येथे ग्रामविकास मंचच्या वतीने गावात करण्यात आलेली जंतूनाशक फवारणी.