रोकडोबा वस्तीवर १५ ते २० बाबा एकत्र येऊन धिंगाणा घालत असल्याची खबर अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीचे सचिव अमोल निकम यांना मिळाली. निकम यांनी याबाबत छावणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाडिले तसेच अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांना याची माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वाढिले, राजेश मोरे,मोठाभाऊ जाधव,मधुकर येठे व अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे सचिव अमोल निकम, खजिनदार जितेंद्र वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथे १५ ते २० बाबा हजर होते. पोलीस आल्याचे लक्षात येताच सर्व बाबांनी धूम ठोकली. वाढीले यांनी बाबाला पोलिसी खाक्या दाखवत समाचार घेतला तर अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे अध्यक्ष व विशेष पोलीस अधिकारी तानाजी शिंदे यांनी बाबाला त्याचे दावे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देताच बाबा गोंधळला व गयावाया करु लागला. त्याच्याकडून जादूटोणा करण्याचे साहित्य जमा करण्यात आले. बाबाला पोलीस ठाण्यात आणून त्यांचेवर महाराष्ट्र नरबळी अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईसाठी दाभाडीचे निरंकार निकम, वसंतदादा मोरे, शेखर पवार, गणेश निकम यांनी सहकार्य केले.
कोट.....
अनेक बाबा एकत्र करून संबंधित बाबाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. श्रद्धा जरुर ठेवा पण ती अंधश्रद्धा नसावी. आपल्या परिसरात असे भोंदूगिरी करणारे असतील तर पोलिसात तक्रार करावी . पोलीस अशा भाेंदूगिरीवर नक्कीच कारवाई करतील.
- प्रवीण वाढीले, पोलीस निरीक्षक, छावणी पोलीस ठाणे
कोट....
भोंदूबाबा हे अतिशय चलाख असतात. श्रद्धेचा फायदा घेऊन नकळत अंधश्रद्धेस खतपाणी घालून आर्थिक व मानसिक खच्चीकरण करतात. असे बरेच बाबा समितीच्या रडारवर आहेत. अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी श्रद्धेचा बाजार मांडणारे व अंधश्रद्धेचे दुकान चालवणाऱ्या भोंदूगिरी करणाऱ्या बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी अशा भोंदूबाबांविरोधात तक्रार दाखल करावी.
- तानाजी शिंदे, विशेष पोलीस अधिकारी
फोटो- ०२ मालेगाव भोंदू बाबा-१
०२ मालेगाव भोंदू बाबा-२
020721\02nsk_18_02072021_13.jpg~020721\02nsk_19_02072021_13.jpg
फोटो- ०२ मालेगाव भोंदू बाबा-१~०२ मालेगाव भोंदू बाबा-२