नाशिक : प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव तसेच त्यानंतर मुलांना सैनिकी संस्कार रूजवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे माजी सरचिटणीस तसेच भोसला शाळेचे माजी प्राचार्य मेजर पी. बी. तथा प्रभाकर बळवंत कुलकर्णी यांचे बुधवारी (दि. २८) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.कुलकर्णी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी नाशिक अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मेजर पी. बी. उपाख्य प्रभाकर बळवंत कुलकर्णी यांची युध्द क्षेत्रातील जाणकार अभ्यासक अशी ख्याती असली तरी भोसलामध्ये शिक्षक, प्राचार्य, समादेशक व संस्थेचे सरचिटणीस अशी कामगिरी बजावल्याने पुढे ही संस्थाच त्यांची ओळख बनली होती. वृध्दापकाळाने त्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर कमी झाला होता. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले आणि भोसला तसेच शैक्षणिक क्षेत्रातील आणि संघ परिवारातील मान्यवरांनी गर्दी केली होती.
भोसलाचे माजी प्राचार्य मेजर कुलकर्णी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 1:02 AM