भोसला मिलीटरी स्कूलतर्फे राष्ट्रीयस्तरावर मैदानी स्पर्धेत आपल्या यशाचा झेंडा फडकविणाऱ्या भोसला `साई` सेंटरच्या खेळाडूंचा आज गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ.बेलगावकर बोलत होते. सैन्य दलात जाण्याचे आणि जीवनात वेगळं काही करू इच्छिण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना `भोसला` परिवाराने नेहमीच प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न केले आहे. स्वप्नपूर्ती करणारी यश देणारी ही रामभूमी देवभूमी आहे,असेही बेलगावकर यांनी नमूद केले. संस्थेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. श्रीपाद नरावणे,कार्यवाह हेमंत देशपांडे,खजिनदार शितल देशपांडे,ग्रुप कॅप्टन विनायक देवधर,देवधर, शालेय समितीचे अध्यक्ष उद्योजक अतुल बेदरकर,शाळेचे कमांडट ब्रिगेडियर एम.एम.मसूर आदी व्यासपीठावर होते.साई प्रशिक्षक विजेंदरसिंग यांनी खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा सादर केला. राष्ट्रगीताने समारोप झाला. स्वराज पंगू याने सुत्रसंचालन केले, रोहन उगले याने आभार मानले.
इन्फो
चौघींचा सन्मान
कॅप्टन नरावणे,बेलगावकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, कोमल जगदाळे,पल्लवी जगदाळे, रिंकी पावरा यांच्या गौरव करण्यात आला. गेल्या पाच वर्षात शंभराहून अधिक पदके भोसलाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर मिळवून संस्थेला नावलौकीक प्राप्त करून दिला आहे. भविष्यातही संस्था त्यांना सर्वप्रकारच्या सुविधा देण्यास आम्ही कटीबध्द असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
फोटो
१७भोसला
भोसलामध्ये संजीवनी जाधव, कोमल जगदाळे, पल्लवी जगदाळे आणि रिंकी पावरा यांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर. समवेत कॅप्टन डॉ. श्रीपाद नरावणे, हेमंत देशपांडे, शितल देशपांडे, विनायक देवधर,अतुल बेदरकर,एम.एम.मसूर, विजेंद्रसिंह आदी.