शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

जिल्हा परिषदेची भोयेगाव शाळा देते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:10 PM

विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक शिक्षणावर भर : कौशल्यपूर्ण दर्जेदार शैक्षणिक वातावरण;  अ‍ॅपद्वारे स्पर्धा परीक्षा सराव

नामदेव भोरनाशिक : विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.भोयेगाव येथील शाळेचे शिक्षकही आंतरराष्ट्रीय मंडळाच्या गुणवत्ता कक्षेच्या तज्ज्ञांच्यानिवडप्रक्रियेत गुणवत्ता सिद्ध करून विविध चाचण्या यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन निवडले गेले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम अध्ययनावरही दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही अपेक्षापूर्ती होत आहे. इंटरनेटच्या मदतीने व्हिडीओ, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, वर्ड फाइल डाउनलोड करून व स्वत: तयार करून अध्यापन केले जात असल्याने रोज काहीतरी नवीन अध्ययानाचा अनुभव मिळणार या उत्सुकतेने विद्यार्थी शाळेत येतात. शाळेत वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, विद्यार्थी शिक्षकांच्या मदतनीने अ‍ॅपही तयार करतात. संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतून संवाद कार्यशाळा, दप्तरमुक्त शनिवार, कुतुहल कोपरा, क्युआर कोडनिर्मिती अशा उपक्रमांसह कांदा लागवड, वेल्डिंग दुकान, नर्सरी यात्रा, गड-किल्ले परिसर व व्यावसाय भेटीतून विद्यार्थ्यांना येथे सर्वांगीन शिक्षण मिळत आहे.पालकांकडून मदतीचा हातलोकसहभागातून शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवून अतिशय प्रभावीपणे वापर सुरू आहे. इंटरनेट, व्हिडिओ, पीपीटी वर्ड फाइलद्वारे अध्यापन प्रक्रिया सुरू आहे.भोयेगाव शिशुगट पॅटर्नभोयेगाव शाळेत शिशुगटापासूनच विद्यार्थी तयार होतात. स्पर्धा परीक्षेत आवड वाढविण्यासाठी एक हजार प्रश्नसंच असलेले ‘चिमुकले बालक‘ नावाचे अ‍ॅप बनवले आहे. विद्यार्थी, पालक त्याचा उपयोग करतात.शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वास्तव आणि रोजच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करण्यासाठी सीबीएसईने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आर्यभट्ट परीक्षेत भोयेगाव शाळेतील १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गटकार्य, गटचर्चा याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अधिकचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. विद्यार्थी व शिक्षक दोघेही शिक्षणाचा आनंद घेत आहेत- निवृत्ती अहेर, मुख्याध्यापक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण