नाशिक : राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांचा समावेश आहे. गिते यांच्या जागी सहायक जिल्हाधिकारी तथा यवतमाळ आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने जिल्हा परिषदेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे महिला राज सुरू होणार आहे. दरम्यान, अमरावती येथील अतीरिक्त आदिवासी आयुक्त एम., ज़े. प्रदीप चंद्रन नाशिक विभागाचे अतीरिक्त महसूलआयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.नरेश गिते गेल्या वर्षी फेबु्रवारीमध्ये मीरा भार्इंदर महापालिकेतून नाशिकला बदलून आले होते. शासनाने त्यांची बदली भंडारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. गिते यांच्या सव्वा वर्षाच्या कारकिर्दीत मात्र अनेक महत्त्वांची कामे जिल्हा परिषदेत होऊ शकली. कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहता, संपूर्ण राज्यात नाशिक पॅटर्न लागू करण्याचा शासनाला निर्णय घ्यावा लागला. त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण, पोषण आहार वाटप व घरकुल बांधकामाच्या कामाबाबत केंद्र व राज्य सरकारकडून नाशिक जिल्हा परिषदेला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या कामाला गिते यांच्या कारकिर्दीतच गती मिळाली. त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या श्रीमती एस. भुवनेश्वरी या २०१५ च्या बॅचच्या आयएएस आहेत. त्यांना महसूल व आदिवासी विकास विभागाच्या कामाचा अनुभव आहे. नाशिक जिल्हा परिषदेत चार महिला पदाधिकारी असून, त्यात आता श्रीमती भुवनेश्वरी आल्यामुळे खºया अर्थाने महिला राज सुरू होणार आहे. यापूर्वीही नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून श्रीमती विनीता सिंगल या महिला अधिकाºयांची नियुक्ती झाली होती.
भुवनेश्वरी नवीन सीईओ; नरेश गिते यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 1:50 AM