शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

बॅँकेच्या थकबाकीवरून भुजबळ-आहेर यांच्यात जुंपली

By श्याम बागुल | Published: May 04, 2019 6:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : लोकसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी संपुष्टात येत नाही तोच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दुष्काळाच्या प्रश्नावर ...

ठळक मुद्देराजकारण पेटले : निवडणुकीसाठी पैसे कोठून आणले?

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी संपुष्टात येत नाही तोच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दुष्काळाच्या प्रश्नावर मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले व जिल्हा बॅँकेकडून शेतकºयांच्या कर्जाची सक्तीने केल्या जात असलेल्या वसुलीचा मुद्दा घेऊन जिल्हा प्रशासनाच्या पुढ्यात गेल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कारखान्याकडेही जिल्हा बॅँकेचे १७ कोटी रुपये थकले असून, त्याचा संदर्भ देत बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी, भुजबळांकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे आहेत मग कर्ज भरण्यासाठी नाहीत काय? असा सवाल करून भुजबळांभोवती फास टाकला आहे, तर दुसरीकडे राष्टÑवादीच्या माजी खासदारांची मालमत्ता जप्त करण्याचे सूतोवाच करून राजकारणाला तोंड फोडले आहे.

छगन भुजबळ यांनी दुष्काळी दौरा करून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून, त्याचाच एक भाग म्हणून शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन पाणी, चाराटंचाईच्या प्रश्नाबरोबरच भाजपाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बॅँकेने दुष्काळी परिस्थितीतही शेतकºयांकडे सक्तीने वसुली सुरू केल्याबद्दल प्रशासनाकडे तक्रार केली आहे. भुजबळ यांच्या या तक्रारीला शेतकरी संघटनेने पुष्टी देत त्यांनीही जिल्हा बॅँकेच्या विरोधात तक्रार करून सक्तीची वसुली न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या थकबाकी वसुलीचा मुद्दा आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय मुद्दा झाला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्हा बॅँकेने बचावाचा पवित्रा घेत, थेट भुजबळांनाच लक्ष्य केले आहे. भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉँग कंपनीकडे बॅँकेचे १७ कोटी रुपये थकले आहेत. त्याचा संदर्भ देत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी, भुजबळ यांना निवडणूक लढविण्यासाठी पैसे आहेत मग बॅँकेची थकबाकी भरण्यासाठी पैसे नाहीत काय असा सवाल विचारला आहे. भुजबळ यांच्यावरील कर्जवसुलीसाठी बॅँकेने पावले उचलताच त्यांनी तडजोडीसाठी बॅँकेशी पत्रव्यवहार केला, परंतु थकबाकी मात्र भरली नाही. आता भुजबळ त्यांच्या विरुद्धची कारवाई टाळण्यासाठी शेतकºयांना पुढे करून स्वत:चे थकीत कर्ज वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आहेर यांनी केला आहे. एवढ्यावरच आहेर थांबले नाहीत, तर राष्टÑवादीचे माजी आमदार देवीदास पिंगळे यांच्या आनंद अ‍ॅग्रो कंपनीकडे असलेली बॅँकेची थकबाकी वसुलीसाठी त्यांची मालमत्ताही जप्त करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेची थकबाकी वसुलीच्या निमित्ताने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकारण पेटले असून, बॅँकेच्या सक्तीच्या वसुलीच्या विरोधात जिल्हा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी फेडरेशननेही पुढाकार घेतला आहे. सोमवारी फेडरेशनने बैठक बोलाविली असून, बॅँकेच्या विरोधात करावयाच्या आंदोलनाची रूपरेषा त्यादिवशी जाहीर करण्यात येणार आहे. एकूणच बॅँकेची वसुली आता शेतकºयांपुरता मर्यादित न राहता, त्यात राजकारण डोकावू लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ