शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

राष्ट्रवादीच्या होर्डिंगवरून भुजबळ गायब

By admin | Published: January 05, 2017 1:50 AM

गटबाजीला उधाण : ओबीसींकडून स्वतंत्र चूल

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या होर्डिंगवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र वगळण्यात आल्याच्या घटनेने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली असून, पक्षातील ओबीसी कार्यकर्त्यांकडून सोशल माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सदरचा प्रकार मुद्दाम करण्यात आला की होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून भुजबळ यांना दूर ठेवण्याचा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला याचा उलगडा मात्र झाला नाही. जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नावाने जिल्ह्णातील ग्रामीण भागात व विशेष करून पिंपळगाव, निफाड तालुक्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याच्या फलकावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व संपर्क नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयोजक म्हणून ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक अध्यक्ष सचिन पिंगळे व आयोजक माजी आमदार दिलीप बनकर यांचे छायाचित्र आहे. या फलकावर छगन भुजबळ यांचे छायाचित्र नसल्याची बाब भुजबळ समर्थकांच्या व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच, त्यातून वेगवेगळे अर्थ काढून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा तीव्र पाऊस पडला. भुजबळ यांना पक्षाने डावलल्याची भावना व्यक्त करतानाच, राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघडकीस आला अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कलंकित असलेले छगन भुजबळ यांचे छायाचित्र वगळण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, फलकातून भुजबळ यांना वगळण्यामागे संबंधितांना जाब विचारला असता, प्रदेश पातळीवरूनच फलक कसा असावा याचे डिझाइन तयार करून देण्यात आल्याने त्यात भुजबळ यांचे छायाचित्र नसल्याचे सांगण्यात आले. प्रदेश पातळीवर पदाधिकारी असलेल्या नाशिक शहरातील राष्ट्रवादीच्या एका आमदाराने या फलकाबाबत महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही सांगण्यात आले. पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच या प्रकारामुळे पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षातील ओबीसी नेत्यांची या संदर्भात गुप्त बैठक होऊन पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहावे की नाही यावर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.