नाशिक : गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी वेगवेगळ्या दौऱ्यांमधून केली. सकाळीच अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांच्यासह निफाड तालुक्यातील नैताळे, सोनेवाडी,गाजरवाडी, हनुमाननगर येथील नुकसानग्रस्त द्राक्षबागांना भेटी देऊन पाहणी केली. सोनेवाडी येथे काशीनाथ शिरसाट, संजय फडोळ यांच्या शेतीला, तर नैताळे येथील विठ्ठल बोरगुडे व श्री साठे यांच्या द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी चुंबळे यांनी केली. त्यानंतर गाजरवाडी येथील मधुकर धुमाळ, माणिक बनकर व हनुमाननगर येथील तानाजी सालगुडे व संतू सालगुडे यांच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. दुपारनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत विजयश्री चुंबळे यांनी येवला तालुक्यातील एरंडगाव, मुखेड, देवगाव, रूई, धानोर, सारोळे थडी या भागांतील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे,कीटकनाशक फवारणीची औषधे सरकारी किमतीत तत्काळ उपलब्ध झाले पाहिजेत, असे आदेश आमदार छगन भुजबळ व अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. भुसेंकडून पाहणी
आजी-माजी मंत्र्यांकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी भुसेंनी दिले तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश, भुजबळ-चुंबळे यांनी दिला धीर
By admin | Published: December 14, 2014 1:50 AM