एकलहरे : येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे येथे १९७० ते १९८२ या कालावधीत वीज मंडळाने १४० मेगावॉटचे प्रत्येकी दोन संच व २१० मेगावॉटचे प्रत्येकी तीन संच उभारले. या केंद्रामुळे अडीच हजार कायम व २५ हजार हंगामी, कंत्राटी कामगारांचा उदरनिवार्हाचा प्रश्न सुटला. मात्र गेल्या १२ वर्षांपासून १४० मेगावॉटचे दोन संच २०१० मध्ये बंद करण्यात आले. त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा प्रकल्प देऊ केला. मात्र तो कागदावरच राहिला. यावेळी माजीमंत्री तुकाराम दिघोळे, माजी खासदार देवीदास पिंगळे, राजाराम धनवटे, विष्णुपंत म्हैसधुने, आसाराम शिंदे, रामदास पाटील डुकरे, केरू धात्रक, बाळासाहेब म्हस्के, अरुण मेढे, हिरामण खोसकर, त्र्यंबक मुळाणे आदी उपस्थित होते.तीनही संचांचे नूतनीकरण करावेसध्या संच क्रमांक ३, ४ व ५ सुरू आहेत. मात्र तेही २०२२ पर्यंत कालबाह्य होऊन बंद करावे लागतील. त्यामुळे आधी या तीनही संचांचे नूतनीकरण करण्यात यावे व नवीन ६६०चा एक किंवा २५० चे तीन संच येथे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज केंद्र बचावासाठी भुजबळांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:47 AM