नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा पक्षाने पटलावर घेतला खरा; परंतु याच निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेवरून भुजबळ यांचे छायाचित्रच वगळल्याने समर्थक मात्र संताप व्यक्त करीत आहेत. विशेषत: सोशल मीडियावर संतापाबरोबरच निषेधही व्यक्त केला जात आहे.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केल्यानंतर मुळातच पक्ष याबाबत गंभीर नसल्याच्या चर्चा पसरत असल्याने वेळोवेळी त्यावर पक्षाला खुलासा करावा लागला आहे. पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात पक्षाने अलीकडेच हल्लाबोल केला असून, राज्यभरात यानिमित्ताने आंदोलने करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रात यासंदर्भातील आंदोलनाचा समारोप नाशिकमध्ये करण्यात आला. शनिवारी (दि.१०) यानिमित्ताने पक्षाने अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत सभाही घेण्यात आली. याचवेळी भुजबळांवरील अन्यायाबरोबरच त्यांच्या प्रकृतीविषयीदेखील राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप करण्यात आला. गोल्फ क्लब मैदानावर झालेल्या सभेच्या निमित्ताने नेत्यांनी भुजबळ यांच्या संदर्भातील मुद्दे उपस्थित केले. यावेळी हल्लाबोल या पुस्तिकेचे प्रकाशनदेखील करण्यात आले. परंतु या पुस्तिकेवर राज्यातील सर्व नेत्यांची छायाचित्रे असताना केवळ छगन भुजबळ यांचेच छायाचित्र नसल्याने समर्थकांना धक्का बसला. सभा सुरू असतानाच भुजबळ समर्थकांच्या विविध व्हॉट्स अॅप गु्रपवरून लगोलग मॅसेज फिरले जाऊ लागले आणि त्यावरून निषेधही करण्यात आला. काहींनी तर पक्षाचे राजीनामे देण्याचीदेखील तयारी दर्शविली आहे. त्यामुळे भुजबळ समर्थक आणि पक्षातील काही नेते असे दोन गट दिसू लागले आहेत. सदरची पुस्तिका तयार करणाºयांनी मात्र भुजबळ यांना डावलण्याचा कोणताही प्रयत्न नाही. सदरचा प्रकार अनवधानाने झाल्याचा खुलासा केला आहे. राष्टÑवादीकडून सारवासारव केली जात असली तरी पक्ष भुजबळांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यासाठी राष्टÑवादीकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्ये झालेल्या भुजबळ समर्थकांच्या अनेक बैठकांमध्ये राष्टÑवादीविषयी गैरसमज करू नये असे सांगण्यासाठी विशेष नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.अंतर्गत वादाची झालरराष्टÑवादीतील काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केल्याची चर्चा आहे. आंदोलनाच्या आणि सभेच्या प्रक्रियेत सामावून घेतले नसल्याच्या भावनेतून संबंधित नेते जाणीवपूर्वक वाद निर्माण करीत असल्याचे पक्षाच्या एका पदाधिकाºयाने सांगितले. छगन भुजबळ हे आमचे नेते आहेत. माझ्या कार्यालयात त्यांची प्रतिमा आहेच शिवाय माझ्या प्रत्येक पत्रक आणि पुस्तिकेवरदेखील त्यांचे छायाचित्र असते. त्यामुळे पुस्तिकेवर त्यांची प्रतिमा वगळण्याचा प्रकार हा जाणीवपूर्वक नाही तर अनवधानाने घडला आहे.- नाना महाले, प्रदेश चिटणीस,राष्टÑवादी कॉँग्रेस
‘हल्लाबोल’च्या पुस्तिकेवरून भुजबळांची छबी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:31 AM
नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा पक्षाने पटलावर घेतला खरा; परंतु याच निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेवरून भुजबळ यांचे छायाचित्रच वगळल्याने समर्थक मात्र संताप व्यक्त करीत आहेत. विशेषत: सोशल मीडियावर संतापाबरोबरच निषेधही व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देमतभेद : भुजबळ समर्थकांकडून सोशल मीडियावर निषेध; पक्षाचे राजीनामे देण्याची तयारी