द्यानेसह परिसरातील नागरिकांची अहोरात्र वर्दळ असलेल्या या फरशीपूल परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा वावर होता. अनेक लुटमारीच्या घटना सतत घडत असल्याने पुलावरून रात्री-बेरात्री जाणे धोक्याचे ठरले होते. महिला व शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनी यांची परिसरातील समाजकंटकांकडून छेडछाड होत असल्याने या भागात पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी माजी नगरसेवक तानाजी देशमुख व रहिवाशांनी केली होती.
मंत्री भुसे यांनी यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला. त्याची दखल घेऊन येथे पोलीस चौकी मंजूर झाली. या प्रस्तावित पोलीस चौकीच्या जागेचे भूमिपूजन भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय दुसाने, नगरसेवक नारायण शिंदे, मानसी देशमुख, भैया देशमुख, प्रवीण इनामदार, अण्णा देशमुख, दीपक शिंदे, रमजानपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, द्याने व श्रीरामनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.