सिडकोत शिवजयंती जन्मोत्सवानिमित्त दोन गट पडून बॅनरबाजीवरून निर्माण झालेल्या वादातून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन परिसरातील अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई केली; परंतु राजकीय कुरघोडीमुळे यंदा जन्मोत्सव साजरा होतो की नाही, अशी साशंकता व्यक्त केली जात होती. या संदर्भात नवीन नाशिक शिवजयंती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पवन कातकडे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करत व शासनाचे सर्व नियमावलीचे पालन करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचे सांगितले. रविवारी पवन नगर स्टेडिअम येथे शिवजयंती उत्सवानिमित्त सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, भाजपा आमदार सीमा हिरे, वसंत गिते, अपूर्व हिरे, मुकेश शहाणे, अजय बागुल, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, नीलेश ठाकरे, कैलास आहिरे, अंकुश पवार, अनिल मटाले, प्रदीप पेशकार, भूषण कदम, गणेश अरींगळे, अंकुश वराडे, राम सूर्यवंशी, राहुल गणोरे अतुल सानप आदी उपस्थित होते.
(फोटो १५ सिडको) कॅप्शन- शिवजयंती सभामंडप भूमिपूजन प्रसंगी हेमंत गोडसे, वसंत गिते, सीमा हिरे, डॉ.अपूर्व हिरे, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, पवन कातकाडे, कैलास अहिरे, रत्नमाला राणे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, आदी.