ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर परीसरात आदिवासी उपाययोजना, ठक्कर बाप्पा योजना, जनसुविधा योजना, डोंगरी विकास योजना व आमदार निधीतून विविध विकास कांमाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार नितीन पवार यांनी यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी ओतुर, शिरसमणी ते सावळदर, भुसणी गावात पेव्हर ब्लॉक, हायमास्ट व पथदिप बसवणे, स्मशानभुमी काम व जिरवाडे, कळवण खुर्द आदिवासी वस्तीत नळ पाणीपुरवठा योजना आदी विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी ओतुर ते मोरे वस्ती या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार नितीन पवार समवेत जि.प माजी बांधकाम सभापती रविंद्र देवरे, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी कँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भामरे, यशवंत गवळी, अशोक देशमुख, हेमंत पाटील, भुषण पगार, संतोष देशमुख, विजय शिरसाठ, विलास रौंदळ, दिगंबर पवार, बबा मोरे, युवराज मोरे, ज्ञानेशवर पवार, दिपक माळी, सरपंच पार्वता गांगुर्डे, हिरामण मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कंडाणे, शिरसमणी, जिरवाडे, भुसणी व कळवण खुर्द येथील कार्यक्रमात गावचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.(१५ ओतुर)कळवण तालुक्यांतील ओतुर येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या उदघाटन प्रसंगी आदार नितीन पवार समवेत धनंजय पवार, यशवंत गवळी, अतुल देवरे, विजय शिरसाठ, राजेंद्र भामरे, अशोक देशमुख, दिगंबर पवार, युवराज मोरे, अशोक मोरे, संतोष देशमुख व हेमंत पाटील, अन्सार पठाण, शहाबान पठाण आदी.
ओतुर परीसरात विकास कामांचेभुमिपुजन अन् लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 11:01 PM
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर परीसरात आदिवासी उपाययोजना, ठक्कर बाप्पा योजना, जनसुविधा योजना, डोंगरी विकास योजना व आमदार निधीतून विविध विकास कांमाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार नितीन पवार यांनी यांच्या हस्ते संपन्न झाला.
ठळक मुद्देकार्यक्रमात गावचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.