यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी विधिवत पुजा करु न सजविलेल्या रथातून पीर बाबा यांची गाव परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित्त पीर बाबा देवस्थानाला रंग रंगोटी तसेच परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री भक्त व ग्रामस्थ्यांच्या मनोरंजनासाठी लोकवर्गणीतून लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून यात्रेत मिठाई, खेळणी, कपडे, भांडी, संसारोपयोगी वस्तु, करमणुकीच्या साधनांची दुकाने थाटण्यात आली होती. दुपारी १२ वाजता गिरणा नदी पात्रात कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. कुस्तीत यश पटकावलेल्या पहिलवानांना आकर्षक वस्तु व रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली. कुस्ती स्पर्धेत कसमादे परिसरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील पहिलवानांनी हजेरी लावली होती. यात्रे निमित्त पंचक्र ोशीतील भक्तांनी व नागरिकांनी यात्रा व पीर बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
भऊरला पीरबाबा यात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 5:58 PM