रामनगर : परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने सातत्याने बिबट्याचे दर्शन होतअसून, शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.शेतकतात पिकांना पाणी देताना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. प्रत्येक दिवशी अनेक शेतकऱ्यांना कधी उसाच्या फडात तर कधी नदीच्या काठावर, गावकुसाला, झाडांच्या आडोशाला बिबट्या नजरेस पडत असल्याने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रामनगर परिसरातील गणेश टेकडी, पिंपळगाव वाट, लिंबालवण, करंजगाव या भागात बिबट्याचे अनेक शेतकºयांना दर्शन झाले आहे. कचरू शिंदे यांच्या गट नं. ३९२ या उसाच्या शेतामध्ये बिबट्या, मादी व दोन बछडे शांताराम शिंदे यांना सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान दिसले. परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारनियमनामुळे रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकºयांना रात्री विद्युतपंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. अशा वेळी रात्री-अपरात्री एकटा शेतकरी जीव मुठीत धरून काम करत आहे तर अनेक शेतकरी बिबट्याच्या भीतीने पिकांना पाणी देत नाही त्यामुळे पाणी असूनही पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
रामनगर परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:46 PM