चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व नागापूर गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे.त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. बिबट्याचा संचार करत असल्याने येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे अवघड झाले आहे.तसेच मागील आठवड्यात नरहरी खालकर यांच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने परिसरात अजून दहशत झाली आहे. नागापूर येथे ऊस क्षेत्र मोठया प्रमाणत आहे.या घटनांचा शेती कामावर परिणाम होत आहे. संध्या शेतीची कामे सुरू असल्याने महिला व मजूरामध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी घरातुन बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. तरी या घटनेची वनविभागाणे गंभीर दखल घ्यावी व नागापूर परिसरात पिंजरा लावावा व बिबट्याच्या कामयचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.प्रतिक्रि या .....पीक काढणीचा व पेरणी चा हंगाम सुरू असून बिबट्याची दहशत वाढत असल्याने मजूर काम करण्यास तयार नसल्याने शेतमालाचे नुकसान होत असल्याने व शेतकर्यांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. वनविभागने याची गंभीर दखल घेत कायमस्वरूपीची कार्यवाही करावी.- किरण गुंजाळ, ग्रामस्थ नागापूर.नागापूर भागात बिबट्याचा वावर वाढत असल्याने लवकरात लवकर वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा.- संदीप गडाख, सदस्य ग्रामपालिका, चांदोरी.
नागापूरात बिबटयाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 6:27 PM
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व नागापूर गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. बिबट्याचा संचार करत असल्याने येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे अवघड झाले आहे.
ठळक मुद्देचांदोरी : हल्यात शेळी ठार ; पिंजरा लावण्याची मागणी