नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारीचे शुक्रवारी (दि. १३) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ६.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलिस्ट्सचे मार्गदर्शक हरिष बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिंद अग्निहोत्री यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत उद््घाटन झाले. यावेळी ५००हून अधिक सायकल वारकरी रवाना झाले.नाशिक सायकलिस्ट्स पंढरपूर सायकलवारीचे हे सातवे वर्षे असून, दरवर्षी सहभागींची संख्या वाढती आहे. या वारीमध्ये पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या स्वाती चव्हाण, नगररचना विभागाच्या सहआयुक्त प्रतिभा भदाणे, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे सहायक आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अशोक नखाते, माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी, नगरसेवक संतोष गायकवाड, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकुमार देसाई, अॅड. दिलीप राठी, राजेंद्र भावसार यांंच्यासह शेकडो सायकलिस्ट्स सहभागी झाले आहेत.पहिल्या दिवशी १६५ किमीचं अंतर कापत वारकरी अहमदनगर शहरात पोहोचणार आहेत. नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. वसंत फड, नितीन फड, सुभाष फड, विनायक गुंजाळ, किसन चत्तर, दिनकर चत्तर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.सायकलवारीची वैशिष्ट्येसौरउर्जेवर चालणारा सायकलरथ. ४‘शून्य कचरा, शून्य प्लॅस्टिक’.४ वृक्षारोपण करून रोपे देणार स्थानिकांना दत्तक.४ वय वर्षे १४ पासून ७० वर्षीय वारकरी सहभागी.४ नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे शहरांतून सायकलिस्ट्स सहभागी.
सायकलवारीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:12 AM
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारीचे शुक्रवारी (दि. १३) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ६.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलिस्ट्सचे मार्गदर्शक हरिष बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिंद अग्निहोत्री यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत उद््घाटन झाले. यावेळी ५००हून अधिक सायकल वारकरी रवाना झाले.
ठळक मुद्देआस विठ्ठलभेटीची पाचशेहून अधिक जणांचा सहभाग