स्थानिक स्कूल समितीचे उपाध्यक्ष मोहन काकड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष किरण भंडारी, सचिव सचिन वाघ, माजी अध्यक्ष सोमनाथ वाघ, सतीश नेहे, प्रोजेक्ट सर्व्हिस सेक्रेटरी सुधीर जोशी, शांताराम दारुंगते, रोहित गुजराथी, कैलास शिंदे, प्रसाद पाटोळे, विनोद दंताळ, सुरेश जोंधळे, शरद आव्हाड, मुख्याध्यापक जयश्री जाधव, संदीप भोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, उपाध्यक्ष अर्जुन आव्हाड, सरपंच रमेश आव्हाड, तंटामुक्ती अध्यक्ष कचूनाना आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे आदी उपस्थित होते.
काकड व मुख्याध्यापक जाधव यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक एस.जे. गिरी यांनी प्रास्ताविक केले. सचिव सचिन वाघ, सुधीर जोशी, रामदास आव्हाड, संदीप भोर यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीराम आव्हाड यांनी आभार मानले. बापू गावंड, भुराराम शिर्वी, शांताराम दारुंगते, प्रसाद पाटोळे, डॉ. भूषण वाघ, दीपक भंडारी, डॉ. शरद हाडपे, भगवान तुपे आदींच्या दातृत्वातून सायकली उपलब्ध झाल्या.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती आव्हाड, दीपक घुले, वसंत आव्हाड, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, भाऊसाहेब कांदे, रामदास आव्हाड, संदीप आव्हाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल वितरण करण्यात आले. राहुल पगारे यांनी सूत्रसंचालन तर संगीता बाविस्कर यांनी आभार मानले.
फोटो - १४ रोटरी
सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरकडून करण्यात आलेल्या सायकल वितरणप्रसंगी मोहन काकड, किरण भंडारी, सचिन वाघ, सोमनाथ वाघ आदी.
140921\14nsk_41_14092021_13.jpg
सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरकडून करण्यात आलेल्या सायकल वितरणप्रसंगी मोहन काकड, किरण भंडारी, सचिन वाघ, सोमनाथ वाघ आदी.