नाशिक : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अंबड येथुन २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थान झाले. सायकल वारीचे प्रथम आयोजक प्रल्हाद भांड यांनी संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले व सायकल वारीचे महत्व विशद केले तसेच सायकल वारीचा १९९९ ते २०१९ पर्यंतचा मागोवा उपस्थित भाविकांना सांगितला. नाशिक ते शेंगाव हे ४५० किमीचे अंतर रोज ११० किमी प्रमाणे भांड व त्यांचे सहकारी अवघ्या ४ दिवसात पुर्ण करणार आहे. नाशिक, मालेगाव, धुळे, मुक्ताईनगर,शेंगाव असा वारीचा मार्ग असुन वारीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाईल. वारी दरम्यान लागणाऱ्या गांवामध्ये मध्यांतरासाठी थांबल्यानंतर प्रल्हाद भांड हे व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, वाहतुकीचे नियम यासह हेल्मेटचा वापराविषयी मार्गदर्शन करणार आहे. तसेच नियमीत सायकल चालविल्याने फायदे तसेच त्यामुळे होणारे इधंन बचत यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहचावा यासाठी प्रयत्न करणार आहे. या सायकल वारीत सिताराम भांड, दिलीप भांड, सोमनाथ भांड, अक्षय तगरे, अविनाश दातीर, राजेंद्र खाणकरी, संजय जाधव, सुनिल अर्दाळर, गिरिश देशपांडे, अनिल भवर, नारायण सुतार, अनिल भावसार, सुधाकर सोणवणे, शरद सरनाईक, विजय चौधरी, अरु ण शिंदे, भागवत जाधव, राजेंद्र सोणवणे, कैलास आहिरे, राजेश्वर सुर्यवंशी हे यात्री सहभागी आहेत. सायकल वारी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी आमदार सिमा हिरे, सुजाता काळे, संजय काळे, सिडको प्रभाग सभापती दिपक दातीर, नगरसेवक दत्तात्रय सुर्यवंशी, प्रतीभा पवार, समर्थ बँकेचे संचालक अरु ण भांड आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र भांड यांनी तर आभार नितीन पुंड यांनी मानले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकल वारीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 4:09 PM
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थान झाले. आयोजक प्रल्हाद भांड यांनी सायकल वारीचा १९९९ ते २०१९ पर्यंतचा मागोवा उपस्थित भाविकांना सांगितला.
ठळक मुद्देअंबड येथुन २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थाननाशिक ते शेंगाव हे ४५० किमीचे अंतर ४ दिवसात पुर्ण करणार