शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

शहरात दुचाकीचोरीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:16 AM

शहराच्या विविध भागांतून पाच मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण पाच दुचाकी वेगवेगळ्या दिवशी चोरीला गेल्या

ठळक मुद्देगुन्हेगारीत वाढ : विविध भागांतून पाच दुचाकी पळविल्या

नाशिक : शहराच्या विविध भागांतून पाच मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण पाच दुचाकी वेगवेगळ्या दिवशी चोरीला गेल्या असून, गुरुवारी (दि.१४) याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट वाढला असून, चोरट्यांनी पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे. पंचवटीतील पेठफाटा परिसरातील म्हाडा इमारतीच्या पार्किंगमधून बुधवारी (दि.१३) ९.३० वाजेपासून ते गुरुवारी ७ वाजेपर्यंतच्या काळात अंदाजे १४ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी क्रमांक एमएच १५ सीयू १३१९ चोरीला गेली. याप्रकरणी दिलीप पुंडलीक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्याच चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये घडली, येथून एमएच १५ डीए २५७६ क्रमांकाची काळ्या रंगाची दुचाकीचोरीला गेल्याची फिर्याद कुणाल चंद्रकांत उबाळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना अशोकामार्ग परिसरात स्वरा डेंटल क्लिनिकजवळ घडली.येथे सोमवारी (दि.११) सायंकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६.१५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एमएच १५ जीक्यू ०४१६ क्रमांकाची ६० हजार रुपये किमतीची मोपेड दुचारी चोरून नेली. याप्रकरणी योगेश अंबादास शेलार यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अंबड परिसरात दोन दुचाकीचोरीला गेल्या असून, मंगळवारी (दि.१२) मोरवाडीतील दत्तमंदिराजवळून एमएच १५ एएल ४३३७ क्रमांक ाची व दहा हजार रुपये किमतीची दुचाकीचोरीला गेली. याप्रकरणी सुनील तुकाराम कातकाडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्रिमूर्ती चौक परिसरात घटनासिडकोच्या त्रिमूर्ती चौक परिसरातील दुर्गामाता मंदिरामागील बाजूस घडली. येथे एमएच १५ ईयू १९९१ क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सुरज शिवदास शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी