नाशिक : महापालिकेत सत्ता आली तरी गेल्या चार वर्षांचा कारभार त्यातच संघटनेतील एकूणच अवस्था बघता भाजपाने आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल केले आहेत. नाशिक महानगरचे प्रभारी म्हणून माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे नवी जबाबदारी सोपविण्यात आली असून, पूर्वीचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्रिपदाची जबाबदारी किशोर काळकर यांच्याऐवजी रवी अनासपुरे यांच्याकडे साेपविण्यात आली आहे. गुरुवारी (दि.१७) पक्ष पदाधिकारी व नगरसेवक यांच्या बैठकीत यासंदर्भात अधिकृतरीत्या माहिती देतानाच ओळख परेडही घेण्यात आली. गेल्या चार वर्षात केलेल्या कामांच्या प्रसिध्दीची आणि लोकांना माहिती देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता लोकांपर्यंत पेाहोचण्याची गरज आहे, अशा शब्दात जयकुमार रावळ यांनी निवडणूक तयारीला लागण्याचे आवाहन केले.
महापालिकेत सत्ता आल्यानंतर ज्या पध्दतीने संघटन वाढणे अपेक्षित आहे, त्या तुलनेत व्हावे यासाठी पक्षाने काही धाडसी निर्णय यापूर्वीच घेतले आहेत. त्यामुळे रावल यांची या अगेादरच नियुक्ती करण्यात आली आहे तर सुमारे महिनापूर्वी संघटन मंत्र्यांच्या जबाबदारीत बदल केले आहेत. संघटन पातळीवर झालेले हे बदल अधिकृतरीत्या मात्र मंगळवारी (दि. १७) नगरसेवकांना सांगण्यात आले. भाजपाच्या वसंत स्मृती येथे झालेल्या बैठकीस पक्षाचे संघटनंमत्री विजय पुराणिक यांनी यासंदर्भात माहिती दिली. विशेष म्हणजे पाच ते सहा दिवसांपूर्वीच विजय पुराणिक आणि रवी अनासपुरे यांनी नाशिकमध्ये येऊन केाअर कमीटीची बैठक घेतली. त्यात महापालिकेतील स्वारस्य त्यासाठी होणाऱ्या आर्थिक तडजेाणी आणि महापालिका तसेच संघटनेतील काहींची तयार झालेली साखळी याबाबत जोरदार चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर वेळ न दवडता आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तातडीने संबंधितांना नाशिकला पाठवून ही दुपारी पदाधिकारी आणि नगरसेवकांची खास बैठक बेालवण्यात आली होती. या बैठकीस महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, उपमहापौर भिकूबाई बागुले, लक्ष्मण सावजी, विजय साने, सुनील बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते सतीश सेानवणे, गटनेता जगदीश पाटील, माजी महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित हेाते.
यावेळी रावळ यांनी मार्गदर्शन करताना संघटना आणि सत्ता एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगताना वर्षभर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कामे करता आली नसली तरी आता मात्र सर्व कामे लोकांसमोर नेण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे विजय पुराणिक यांनी नगरसेवकांना त्यांच्या कामांची माहिती विचारली आणि लोकापर्यंत कामे पोहोचवण्याची वेळ आल्याचे सांगितले.
इन्फो...
आज पुन्हा कोअर कमिटीची बैठक
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यातील बैठकानंतर गुरुवारी (दि.१७) बैंक झाली. आता संघटनमंत्री शुक्रवारी (दि.१८) पुन्हा कोअर कमिटीची बैठक हेाणार आहे.
इन्फो..
नगरसेवकांना खंत
पक्षाचे नवे महानगर प्रभारी आणि संघटनमंत्र्यांसमोर आपली मते मांडण्याची नगरसेवकांना खूप इच्छा होती. मात्र, त्यांना बोलता आले नाही. त्यामुळे एकतर्फी संवाद झाला अशी खंत काही नगरसेवकांनी बेालून दाखवली.