नाशिक : ‘सिरिया’मध्ये होत असलेला बॉम्बहल्ला मानवतेला काळिमा फासणारा असून, यामध्ये निष्पाप बालकांचा बळी जात आहे. संयुक्त राष्टÑसंघाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध मुस्लीम धार्मिक संघटनांकडून करण्यात आली. सिरियाच्या शांततेसाठी शुक्रवारच्या (जुमा) नमाजदरम्यान विविध मशिदींमध्ये प्रार्थना करण्यात आली. मागील काही दिवसांपासून सिरिया देशात बॉम्बहल्ल्याचा आगडोंब उसळला असून, यामध्ये शेकडो मुले, महिला मृत्युमुखी पडल्या आहेत. सत्तेसाठी लढणाºयांनी हा नरसंहार तातडीने थांबवावा, अशी मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. शुक्रवारी (दि.२) शहरातील रजा, नुरी अकादमीच्या वतीने बडी दर्गा येथे सिरियामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्टÑसंघाने तातडीने सिरियामधील बॉम्बहल्ल्याबाबत हस्तक्षेप करून सिरिया वाचविण्यासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिरियाच्या सध्य स्थितीच्या छायाचित्रांचे फलक यावेळी झळकविली. दरम्यान, हाजी वसीम पिरजादा, मीर मुख्तार अशरफी, एजाज रजा यांनी यावेळी सिरियामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
बडी दर्गा : नरसंहार थांबविण्याची मागणी ‘सिरिया’च्या शांततेसाठी मुस्लिमांची दुआ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:59 AM
नाशिक : ‘सिरिया’मध्ये होत असलेला बॉम्बहल्ला मानवतेला काळिमा फासणारा असून, यामध्ये निष्पाप बालकांचा बळी जात आहे. संयुक्त राष्टÑसंघाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध मुस्लीम धार्मिक संघटनांकडून करण्यात आली.
ठळक मुद्देनमाजदरम्यान विविध मशिदींमध्ये प्रार्थना सिरिया वाचविण्यासाठी कठोर पावले उचलावी