मी नाराज नाही. माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. पण गेल्या ४२ वर्षापासून राजकारणात एवढी मोठं पद मिळाली याच्यापेक्षा अजून दूसरा काय हवंय? त्यामुळे मी नाराज कसा असू शकतो, असं स्पष्टीकरण राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं. तसेच शिंदे गटापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असणाऱ्यांची मोठी फौज असल्याचा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला. त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक समर्थक आमदार आणि खासदार गुवाहाटीला गेले आहेत. मात्र अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील गुवाहाटीला गेले नाहीत. यावर देखील अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखं आहे. भविष्यात मी गुवाहाटीला नक्की जाईल, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फिरलं पाहिजे. शिवसेना का फुटली याचे मूल्यमापन केले पाहीजे. आधीच कळलं असत तर फिरायची वेळ आली नसते. अडीच वर्षात केवळ ४ वेळा उद्धव ठाकरे खुर्चीवर बसले, असा निशाणा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.