नवनाथ गायकरआहुर्ली : भारतीय न्यायपालिकेतील निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत सातत्याने माध्यमे व समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असते. अनेकदा न्याय मिळतो, पण कधीकधी हा न्याय पाहायला व अनुभवायला ती व्यक्ती हयात नसते. अशा निकालाचा फारसा आनंददेखील वेळ निघून गेल्याने मोकळ्या स्वरूपात व्यक्त करता येत नाही. अशीच घटना इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत घडली.नाशिक जिल्ह्यातील एक दिग्गज नेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पत्नी तथा जि.प.च्या माजी उपाध्यक्ष स्व. इंदुमती गुळवे यांच्या बाबतीत घडला आहे. स्व. गुळवे यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकाराचा वारसा त्यांची पत्नी स्व. इंदुमती गुळवे यांनी तितक्याच समर्थपणे पेलला होता.स्व. गुळवे यांच्यानंतर त्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या, तर चिरंजीव ॲड. संदीप गुळवे हे सलग दोनवेळा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक म्हणून काम पाहत आहेत.स्व. इंदुमती गुळवे यांनी पुणे शिखर बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवली होती. सन २०१८ मध्ये झालेल्या या निवडणुकीबाबत वाद झाल्याने ही प्रक्रिया न्यायालयीन बाबीत अडकल्याने मतमोजणीला स्थगिती मिळून निकाल मात्र वादात अडकला होता.सन २०१८ पासून सुरू असलेला हा वाद तब्बल पाच वर्षांच्या दिरंगाईनंतर मतमोजणी होऊन सन २०२२ मध्ये शमला आहे. दरम्यान, वाद शमल्यानंतर तब्बल पाच वर्षे बंदिस्त झालेला निकाल मतमोजणी होऊन जाहीर करण्यात आला आहे.यात स्व. इंदुमती गुळवे या विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.दुर्दैवाने विजयाची ही सुवार्ता येण्याच्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याने हा निकाल म्हणजे एका डोळ्यात अश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात आनंद असा प्रकार झाला आहे.या निकालानंतर स्व. इंदुमती गुळवे यांच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळणारे महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेचे सचिव, म्हाळसाकोरे सह. सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब ढोबळे व कैलास वाघ या खंद्या समर्थकांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. स्व. इंदुमती गुळवे यांच्या विजयासाठी या दोन्ही समर्थकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.परिश्रमाचे सार्थक पण आनंद अधुरास्व. इंदुमती गुळवे यांना राज्य पातळीवर सहकार क्षेत्रात या विजयाच्या रूपाने मोठे सुयश मिळाले, पण दुर्दैवाने हा विजय पाहायला त्या नाहीत. त्यामुळे विजयाचा आनंद उपभोगायला त्या हयात नसल्याने परिश्रमाचे सार्थक झाले, मात्र आनंद अधुरा राहिला.- बाळासाहेब ढोबळे
इंदुमती गुळवे यांचा मृत्युपश्चात मोठा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 10:20 PM
नवनाथ गायकर आहुर्ली : भारतीय न्यायपालिकेतील निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत सातत्याने माध्यमे व समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असते. अनेकदा न्याय मिळतो, पण कधीकधी हा न्याय पाहायला व अनुभवायला ती व्यक्ती हयात नसते. अशा निकालाचा फारसा आनंददेखील वेळ निघून गेल्याने मोकळ्या स्वरूपात व्यक्त करता येत नाही. अशीच घटना इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत घडली.
ठळक मुद्देइगतपुरी : महाराष्ट्र राज्य बाजार संघ समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल