शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

शैक्षणिक साहित्यांनी बहरली बाजारपेठ

By admin | Published: May 16, 2017 12:26 AM

नाशिक : शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, मागणी स्थिर असल्याने वस्तूंचे दरही स्थिर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, मागणी स्थिर असल्याने वस्तूंचे दरही स्थिर आहेत. मागणी वाढल्यास भाव वाढू शकतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. दप्तर, वॉटरबॅग, डबे, कंपास पेटी, बूट, सॉक्स, वह्या, रेनकोट आदिंसह सर्वच शैक्षणिक साहित्यात यंदा वैविध्यपूर्ण प्रकार पहायला मिळत असून, बच्चेकंपनीची आवड लक्षात घेत त्यात निर्मात्यांनी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. साधारणत: १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून, जूनमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीचा एकदम आर्थिक बोजा पडायला नको म्हणून अनेक पालक मे महिन्यामध्येच थोडीफार खरेदी उरकून घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे मेनरोडसह उपनगरातल्या सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.मुले आपल्या आवडीचे कार्टुन, चित्र, आवडीचे रंग असणाऱ्या वस्तूंचा हट्ट धरत आहेत, तर पालक किंमत, टिकाऊपणा व मुलांची आवड यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यापासून साहित्य खरेदीला ग्राहकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे.दप्तरांमध्ये नेहमीच्या प्रकारांबरोबरच ‘५०० बाय ५०० डेनिअर मटेरियल’, लाईट वेट प्रकार आलेले आहेत. याशिवाय यंदाही ट्रॉली स्कूलबॅगला मागणी आहे. दप्तरांबरोबरच रेनकव्हरलाही मागणी आहे. याशिवाय टिफीनबॅग, वॉटरबॅग, डबे, कंपास पेटी, बूट, सॉक्स, वह्या, रेनकोट यांच्यातही भरपूर प्रकार आलेले आहेत. ट्रॉली बॅग ९०० ते १५०० रु., पेन्सिल पाऊच १० ते ३०० रु., रेनकव्हर ४० ते ३०० रुपये, टिफीन बॅग १५ ते ३०० रुपये आदि दरांमध्ये उपलब्ध आहेत.