नाशिक : परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पाथर्डी फाटा परिसरातील माऊलीनगर रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे. सिडकोतील बडदेनगर येथील रविवासी अंजली परमेश्वर पाटील (५०) गुरुवारी (दि.३०) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वासननगर येथे कल्पतरु बंगल्या जवळ पाठीमागुन आलेल्या काळया रंगाची पल्सर तिचेवरील हेल्मेट व काळे रंगाचे जाकेट घातलेला , उंच व शरीराने सडपातळ अंदाजे ३० वर्षे वयाच्या चालक तरुणासह मागे तब्येतीने मजबूत काळे रंगाचे जाकेट घालून घातलेला २५ वर्षे वयाचा तरुणांनी अंजली पाटील मोपेड दुचाकी क्रमांक एमएच १५ ईक्यु ८८९९ वरून मुलाच्या लग्नाची पत्रीका देण्यासाठी जात असताना त्यांच्या गळयातील सोन्याची पोत चोरट्यांनी खेचू नेली. या घटनेनंर अंजली पाटील व त्यांच्या चुलत ननंद मंजु रामसिंग पाटील आरडा ओरडा करून चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु चोरटे भरधाव वेगात निघुन गेले. त्यामुळे अंजली पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इंदिरानगर परिसरातील पादचारी महिलांचे सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना आता दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांनाही सोनसाखळी चोरांनी लक्ष केल्याने दुचाकी चालक महिलांचा अपघात होऊन त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशकात दागिने चोरीचे सत्र सुरुच ;दुचाकीचालक महिलेची सोनसाखळी खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 4:17 PM
नाशकात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पाथर्डी फाटा परिसरातील माऊलीनगर रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे.
ठळक मुद्देमहिलेच्या गळ्यातील पाच तोळयाची सोन्याची पोत खेचलीपोत खेचून चोरटे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून फरार