येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील भावात सतत तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यांपासून दिसत आहे.येवला बाजार आवारात शुक्रवारी (दि. ५) १४ हजार क्विंटल आवक झाली. त्यात ३६१० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. लगतच्या पाच राज्यांत अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पीक पुरते संपुष्टात आल्याने, देशांतर्गत कांद्याची गरज भागविण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली आहे.कांद्याचे भाव रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. परंतु देशातील मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण न जुळल्याने शेतकºयाच्या कांद्याला यंदा सलग पाच महिने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया अखेर निसर्गानेच केली. येवला बाजार आवारात शुक्रवारी १४ हजार क्विंटल आवक झाली. त्यात ३६१० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. येवला गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये कांद्याची आवक तीनपट वाढली होती. एप्रिल महिन्यात दोन लाख ३० हजार क्विंटल आवक झाली. निरंतर आवकेत वाढच होत आहे. एप्रिलमध्ये सरासरी केवळ ३६० रुपये प्रतिक्विंटल भाव, तर मेमध्ये कांद्याचे बाजारभाव केवळ ३२५ रुपये प्रतिक्विंटल झाले. तुलनेत निम्म्याने भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळाले होते आणि शेतकरी आगीतून फुफाट्यात पडला होता. परंतु आॅगस्ट २०१७ पासून कांद्याला चांगले दिवस आले. नाशिक, पुणे, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यांतील कांदा संपूर्ण देशात कांद्याची गरज भागवण्यासाठी वापरला जात आहे. मध्य प्रदेशात कांदा गडगडल्याने तेथील राज्य शासनाने ८०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला. तोच कांदा शासनाने झळ खावून ३०० ते ३५० रुपयाने बाजारात आणला. हाच मध्य प्रदेशातील अतिरिक्त माल देशभर पोहचला. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहिले. १० जुलैला मध्य प्रदेश शासनाने हमीभावाची कांदा खरेदी बंद केली. शिवाय देशात, राजस्थान, गुजरात, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात पुरामुळे कांदा पुरता नष्ट झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आणि कांद्याला चांगले दिवस आले.
बळीराजा समाधानी : आॅगस्ट ते डिसेंबर महिन्यात सर्वाधिक आवक येवल्यात कांदा @ 3610
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:52 AM
येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील भावात सतत तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यांपासून दिसत आहे.
ठळक मुद्देबळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया कांद्याची आवक तीनपट वाढली