तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांनी २०१० साली शेतीसाठी नवीन वीज जोडणीसाठी ४६०० रुपयाचे कोटेशन शुल्क भरुन महावितरणकडे अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजे तब्बल १० वर्षांनी त्यांच्या माळावरील शेतात महावितरणने नवीन जाेडणीसाठी डी. पी. बसवून दिली. मात्र सदर डी.पी. सोबत असलेला ट्रान्सफॉर्मर हा फॉल्टी असल्याने, सदर डी.पी. ला वीज सप्लाय दिलाच नाही. सदर ट्रान्सफॉर्मर बदलून मिळावा म्हणून रंजक ढोकळे यांनी येवला येथील महावितरणच्या कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या पण महावितरणने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, रंजक ढोकळे हे मागील महिन्यात पुन्हा एकदा महावितरणच्या येवला येथील उप विभागीय कार्यालयात गेले असता त्यांच्या हातावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चक्क ९७१० रुपयांचे बिल थोपविले व सदर रक्कम भरल्याशिवाय आपल्याला नवीन ट्रान्सफॉर्मर देणार नाही असे सांगितले. त्यामुळे या शेतकऱ्याने आता महावितरणला तब्बल ५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
कोट.....
नोटिशीची बजावणी महावितरणच्या येवला येथील उप विभागीय कार्यालयास इमेल व व्हाटस् द्वारे करण्यात आली असून महावितरणला १५ दिवसांचा अवधी
देण्यात आला आहे. या काळात जर महावितरणने नुकसान भरपाईची मागणी पुर्ण केली नाही तर ग्राहक
न्यायालयात दाद मागणार आहे.
- ॲड. एकनाथ ढोकळे