ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पिंपळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संपत रखमाजी बिन्नर यांची तर उपसरपंचपदी शांताबाई विठोबा सदगीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिंपळे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे पुरस्कृत गटाने सहा जागांवर विजय मिळवत एकहात्ती सत्ता मिळवली. यावेळी सरपंचपद हे सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असल्याने शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी कोते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा पार पडली. यावेळी ग्रामसेवक किशोर विभुते यांनी सहकार्य केले. सरपंच पदासाठी संपत रखमाजी बिन्नर यांनी अर्ज दाखल केला तर सूचक म्हणून संजय शिवराम पानसरे यांची स्वाक्षरी होती, तर उपसरपंच पदासाठी शांताबाई विठोबा सदगीर यांनी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून लता सुदाम रुपवते यांची स्वाक्षरी होती. निर्धारित वेळेत दोनच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कोते यांनी दुपारी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
फोटो ओळी- पिंपळे ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. (२७ पिंपळे)