समृद्ध जैवविविधता आणि जैव वस्तुमान (बायोमास) निर्मितीमध्ये गवताळ प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्वधारण एक हेक्टर गवती कुरणाच्या क्षेत्रातून सरासरी ५०० किलोग्रॅमपर्यंत बायोमास उपलब्ध होऊ शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच समृद्ध जैवविविधतेकरिताही गवताळ प्रदेशाची महत्त्वाची भूमिका असते. काळविटांसारख्या सस्तन वन्यजिवांना यामाध्यमातून सकस स्वरूपाचा चारा उपलब्ध करून देण्याचा वनविभागाचा गवताळ कुरण क्षेत्र विकासामागील उद्देश आहे. यामुळे काळवीट प्रजातीच्या संवर्धनाला ‘बुस्ट’मिळेल असा विश्वास मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी व्यक्त केला आहे.
---कोट--
ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्र काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. येथील काळविटांना मुबलक प्रमाणात वैविध्यपूर्ण चारा मिळावा, जेणेकरून चाऱ्याच्या भटकंतीसाठी काळवीट संवर्धन राखीव वनातून अन्यत्र जाणार नाही आणि आजूबाजूच्या शेतपिकांचे नुकसान आणि काळविटांचे अपघात टळण्यास मदत होईल.
- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक
--इन्फो--
...येथे होणार गवत कुरणक्षेत्र
नाशिक पूर्व वनविभागाच्या हद्दीत एकूण १४० हेक्टरवर गवती कुरण क्षेत्र विकसित केले जाणार आहे. यामध्ये ममदापूर, चांदवड आणि येवल्याचा काही भाग निवडण्यात आला आहे. मालेगाव उपविभागीय कार्यालयांतर्गत २० हेक्टरवर गवती कुरणाची लागवड केली जाणार आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा काळविटांचा अधिवास असल्याने या भागातदेखील रेहकुरी अभयारण्याच्या परिसरात तसेच अन्य काही गवताळ सपाट जागांवर गवती कुरण सुमारे १४५ हेक्टरवर विकसित केले जाणार आहेे.
---इन्फो--
गवताच्या या प्रजातींची लागवड
शेडा, पवण्या, दिनानाथ, डोंगरी, बेर, मारवेल, अंजन यांसारख्या गवताच्या प्रजातींची निवड वनविभागाकडून करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून या प्रजातीच्या बियांच्या माध्यमातून रोपनिर्मिती केली जात होती. रोपांची उपलब्धतेनुसार यावर्षी गवत कुरण लागवडीचा ‘श्रीगणेशा’ करण्यात येणार आहे.
--इन्फो--
कार्यशाळेतून दिले धडे
वनधिकारी यांनी वनरक्षक, वनमजुरांची ममदापूर संवर्धन राखीव वनात मागील वर्षी कार्यशाळा घेत गवत लागवडीचे धडेही दिले आहे. यावेळी नाशिक, अहमदनगर, जळगाव येथील वनकर्मचारी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत सेवानिवृत्त वनसंरक्षक तथा कुरण अभ्यासक सुभाष बडवे यांनी मार्गदर्शन केले होते.
===Photopath===
240621\24nsk_31_24062021_13.jpg~240621\24nsk_32_24062021_13.jpg
===Caption===
गवताच्या प्रजातींची रोपवाटिकेत झालेली वाड~गवताच्या प्रजातींची रोपवाटिकेत झालेली वाड