नाशिक : घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जाळणाºया पतीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़२३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ राष्ट्रपाल आनंदा धाबो (२७, रा़ कवठेकरवाडी, पांडवलेणी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात नऊ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़ पाथर्डी फाट्यावरील कवठेकरवाडीमध्ये आरोपी राष्ट्रपाल आनंदा धाबो हा पत्नी रमासह राहात होता़ ७ जानेवारी २०१६ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणानंतर राष्ट्रपालने पत्नीला मारहाण केली़ यामुळे पत्नी रमा हिने घरातील कॅनमधील डिझेल अंगावर ओतून घेत जाळून घेण्याची धमकी दिली़ यानंतर पती राष्ट्रपाल याने अधिक शिवीगाळ करून पत्नीच्या अंगावर जमिनीवर डिझेल पडले असल्याचे माहिती असूनही काडी पेटवून पत्नीच्या अंगावर टाकली़ यामुळे रमाच्या अंगावरील साडीने पेट घेतला व ती ओरडू लागल्याने राष्ट्रपालने पलायनाचा प्रयत्न केला़ मात्र, नागरिक जमा झाल्याने त्याने पत्नीची साडी विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती ९० टक्के जळाल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात राष्ट्रपाल धाबो विरोधात जिवे ठार मारण्याचा व त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी नऊ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़ दोन मृत्युपूर्व जबाबरमा धाबो या विवाहितेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना स्ट्रोव्हच्या भडक्यात भाजल्याचे सांगितले, तर आपल्या भावास पतीने जाळल्याचे सांगितले. मात्र दुसºया जबाबात पतीने काडी लावून पेटविल्याचा जबाब दिला. त्यामुळे या खटल्यात मयत रमा धाबोचे दोन मृत्युपूर्व जबाब होते. न्यायाधीश शिंदे यांनी परिस्थितीजन्य पुरावे हे दुसºया जबाबाशी तर्कसंगत असल्याने तो ग्राह्य धरत शिक्षा सुनावली.
पत्नीस जाळून मारणाºया पतीस जन्मठेपमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:52 PM