नाशिकरोड : पुस्तकी ज्ञानाबरोबर सद्य:परिस्थितीचे आकलन व वास्तव भूगोलाचे ज्ञान आत्मसात करा, सामाजिक परिस्थितीची जाण ठेवून सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कार्य करा, असे प्रतिपादन मालेगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी केले. चांडक-बिटको महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात प्राचार्य निकम बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वडनेरभैरव महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल भगत, प्राचार्य धनेश कलाल, समन्वयक प्रा. नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झालीत. तसेच माजी विद्यार्थ्यांनीदेखील आपले अनुभव कथन केले. प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख प्रा. अनिलकुमार पाठारे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. लक्ष्मण शेंडगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सुधाकर बोरसे व आभार प्रा. अर्चना पाटील यांनी मानले. माजी विद्यार्थी मेळाव्यास ७० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
बिटको महाविद्यालय माजी विद्यार्थी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:36 PM