लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नव्या जागेतदेखील कोरोनाबाधितांसाठी बेडची संख्या वाढविण्याच्या तसेच येथील लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. शुक्रवारी (दि. २८) बिटकोबरोबरच समाज कल्याण येथील कोरोना कक्ष, कथडा येथील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.नाशिकरोड येथील रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, व्हेंटिलेटर, गॅस पाइपलाइन, एकूण बेड व रिक्तबेडची संख्या याबाबत माहिती घेतली. तसेच स्कॅनिंग मशिन्स, एमआरआय, सिटीस्कॅनची पहाणी त्यांनी केली. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी याठिकाणी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाºया मास्क, पीपीई किट, औषध पुरवठा, रुग्णांसाठी असलेला औषध साठा आणि अन्य उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी आमदार सरोज आहेर व नगरसेवक प्रशांत दिवे यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला तसेच येथील सीसीटीव्हीची माहिती डॉ. गरुड यांनी दिली.यावेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड उपस्थित होते.डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातही पाहणीडॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातही आॅक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर बेड तसेच रिक्त बेड याबाबत आयुक्तांनी माहिती जाणून घेतली आणि रुग्णांना उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
बिटको नवीन रुग्णालयाच्या तळ मजल्यावर बेड वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:13 PM
नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नव्या जागेतदेखील कोरोनाबाधितांसाठी बेडची संख्या वाढविण्याच्या तसेच येथील लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. शुक्रवारी (दि. २८) बिटकोबरोबरच समाज कल्याण येथील कोरोना कक्ष, कथडा येथील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
ठळक मुद्देउपाययोजना । आयुक्तांनी केली पाहणी;