शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
4
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
5
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
6
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
7
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
8
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
9
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
10
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
11
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
12
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
13
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
15
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
16
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
17
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
18
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
19
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
20
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

पिसाळलेल्या श्वानाचा जनावरांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:18 AM

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण शिवारातील शेतकऱ्यांच्या जनावरांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने शेतकरी व पशुपालकांचे नुकसान झाले आहे यात काही जनावरांना गंभीर इजा झाली असून, पिसाळलेल्या श्वानाच्या भीतीने गाव व शिवार परिसरातील शेतकऱ्यांनी धसका घेतला असून, जखमी जनावरांवर नवी बेज येथील पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. आहेर यांनी उपचार केले आहेत.

ठळक मुद्दे मृत जनावराचे मास खाल्ल्याने परिसरातील भटके श्वानही पिसाळले असल्याचे शेतकरी बांधवांकडून यावेळी सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण शिवारातील शेतकऱ्यांच्या जनावरांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने शेतकरी व पशुपालकांचे नुकसान झाले आहे यात काही जनावरांना गंभीर इजा झाली असून, पिसाळलेल्या श्वानाच्या भीतीने गाव व शिवार परिसरातील शेतकऱ्यांनी धसका घेतला असून, जखमी जनावरांवर नवी बेज येथील पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. आहेर यांनी उपचार केले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून भादवण गावाजवळील राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील गिरणा पुलावर अज्ञात शेतकºयाने पिसाळलेला श्वान चावल्याने मृत झालेले पशुधन पुलाच्या रस्त्याच्या मोकळ्या परिसरात टाकल्याने या परिसरातील भटक्या श्वानांनी या मृत जनावराचे मास खाल्ल्याने परिसरातील भटके श्वानही पिसाळले असल्याचे शेतकरी बांधवांकडून यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात येथील शेतकरी बांधवांनी व भादवण येथील मनसेचे तालुका उपाध्यक्ष गौतम जाधव यांनी दि. ३१ रोजी कळवण पोलिसात निवेदन देऊन तक्रार केली होती व पोलिसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले होते व रविवारी दुपारी चार वाजता शिवारातील भटके श्वान पिसाळल्याने या श्वानाने भादवण येथील पोलीसपाटील कैलास जाधव यांच्या बैलजोडीला चावा घेतला असून, रोशन जाधव यांची दुभती म्हैस, योगेश जाधव यांच्या शेळ्यांनाही चावा घेत गंभीर जखमी केले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले.पिसाळलेल्या श्वानाने शेतकºयांच्या शेळ्या, गाय, पारडू, बैल यांना चावा घेतल्याने शेतकरी व पशुपालकांचे नुकसान झाले आहे. भादवण गाव व परिसरात पाळीव श्वानांची संख्या कमी असून गाव व शिवारात मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ होत असून, पावसाळ्यात गाव परिसरातील मोकाट श्वानही पिसाळल्याने पशुपालक व गावकºयांना जनावरे, लहान बालके, वृद्ध, शाळकरी मुले व मोटारसायकलस्वार यांना त्याचा त्रास होत आहे.असून शेतकर्यांच्या शेळ्या ,गाय ,पारडू ,बैल या पाळीव जनावरांना पिसाळलेली कुत्रे चावल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे . श्वानांच्या बंदोबस्ताची मागणीलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर पिसाळलेल्या श्वानाने धुमाकूळ घातला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिक व दोन लहान मुलांना चावा घेऊन जखमी केले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना गड उतरण्यासाठी ट्रस्टने स्वतंत्र पायºयांची व्यवस्था केली आहे. गडावरील एका रहिवाशाने पाळलेले श्वान पिसाळले म्हणून ट्रस्टच्या वेटिंग हॉलमध्ये मोकाट सोडून दिले. ते भाविकांच्या अंगावर धावून जात आहे. त्याने अनेकांना चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रामपंचायतीने व ट्रस्टने या पिसाळलेल्या श्वानाचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच संबंधित श्वानाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थांनी केली आहे.