शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

कडवा धरण ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 5:25 PM

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असुन त्यामुळे सकाळी तालुक्यातील ८५.७० दशलक्ष घनमीटर क्षमतेचे कडवा धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे भविष्यात लाभ क्षेत्रातील सिन्नर व इतर खालच्या भागातुन जाणा-या ८८ किमी च्या कडवा कालव्यातुन सोडलेल्या पाण्याच्या माध्यमातून एकूण सुमारे १९ हजार ४०४ हेक्टर शेती क्षेत्र ओलिता खाली येणार असुन त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्र्गी लागला आहे.

ठळक मुद्देइगतपुरी:सिंचनाचा प्रश्न लागला मार्गी, विधिवत जलपूजन

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असुन त्यामुळे सकाळी तालुक्यातील ८५.७० दशलक्ष घनमीटर क्षमतेचे कडवा धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे भविष्यात लाभ क्षेत्रातील सिन्नर व इतर खालच्या भागातुन जाणा-या ८८ किमी च्या कडवा कालव्यातुन सोडलेल्या पाण्याच्या माध्यमातून एकूण सुमारे १९ हजार ४०४ हेक्टर शेती क्षेत्र ओलिता खाली येणार असुन त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्र्गी लागला आहे.कडवा धरण शंभर टक्के भरल्याचे औचित्य साधुन परिसरातील निनावीचे सरपंच गणेश टोचे, पिंपळगाव घाडगा सरपंच देविदास देवगिरे, पिंपळगाव डुकराचे सरपंच भगवान वाकचौरे,मायदराचे सरपंच साहेबराव बांबळे,गुरु हनुमान आखाड़ा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांचे हस्ते जलपूजन करण्यात आले.इगतपुरी तालुक्यातील भावली, भाम त्याच प्रमाणे दारणा पाठोपाठ चौथे कडवा धरणही भरले आहे. आता मुकणे व वाकी-खापरी ही दोन्ही धरणे भरण्याची प्रतीक्षा आहे. तालुक्यात आजपर्यंत जवळपास पावने तीन हजार मिमी पाऊस पडला आहे. मुकणे धरणात जवळपास ६५ टक्के पाणी उपलब्ध झालेले आहे. सांजेगाव पर्यंत पाणी टेकायला गेले आहे. तर वाकी-खापरित देखील आज ५५ टक्के पाणी आल्याची माहिती नाशिक जलसंपदा विभागाने दिली. पावसाच्या माहेरघरावर दरवर्षी प्रमाणे आभाळमाया झाल्यामुळे तालुक्यातील चार धरणे भरली असुन उर्वरित दोन्ही धरणे लवकरच भरतील असा अंदाज आहे. तसेच खेड,वाडीव-हे व इतर छोटे मोठे लघु पाटबंधारे प्रकल्प दुथडी भरून वाहत आहेत. डवा धरणावर जलपूजन करते वेळी कड़वाचे निरीक्षक माळी, शिपाई जुंद्रे व ग्रामस्थ उपस्थित होते. कडवा धरण भरल्यामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी समाधानी आहेत.सुरुवातीला पावसाने दीड़ महिना ओढ़ दिली होती. त्यामुळे पावसाच्या माहेरघरावर कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिति निर्माण झाली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांत च पावसाने सुमारे दोन हजार मिमी बरसुन सरासरी कड़े जोरात वाटचाल केली आहे. मंगळवारी नक्षत्र बदलले आहे तेव्हापासून पाऊस अजुन जोरात सुरु आहे. ही स्थिति यापुढे काही दिवस अशीच कायम रहिल्यास नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत मुकणे आणि वाकी-खापरी ही दोन्ही धरणे भरण्याच्या मार्गावर असतील. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण