महापालिकेच्या राजकारणात प्रथमच सदस्य नियुक्तीच्या निमित्ताने असे लेटर वॉर सुरू झाले आहे. सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर भाजपने देखील जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार सेनेला महासभा बेकायदेशीर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे आणि निर्णय रद्द करावी असा सल्ला स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी दिला आहे. उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार झालेल्या निवड सभेतही अडचण वाटत असेल शासनाकडून स्थगिती आणावी, भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यास तयार आहे.
शिवसेनेचा एक ज्यादा सदस्य नियुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले हेाते. त्यानुसार भाजपाने बुधवारी (दि.२४) विशेष महासभा बोलवली हेाती. त्यात सर्व समितीची पुनर्रचना करून सेनेवर कडी करण्यात आली. त्यामुळे सेनेने भाजपाच्या प्रा. वर्षा भालेराव, सुप्रिया खोडे, राकेश दोंदे आणि हेमंत शेट्टी यांचा दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली असताना त्यांना एका वर्षात बदलले त्याच्यासाठी त्यांचे राजीनामे न घेणे बेकायदेशीर असल्याने आता या ठरावावर कोणतीही कार्यवाही करू नये आणि हा प्रस्ताव शासनाकडे विखंडीत करण्यासाठी पाठवावा अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. त्याला उत्तर देताना भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले असून त्यात शिवसेनेच्या गटनेत्यांनी पत्र बंद लिफाफ्यात न पाठवल्याने आणि आयुक्तांना त्याची एक प्रत न पाठवल्याने त्यांचे तीन नवनियुक्त सदस्य अपात्र करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद आता विकोपाला गेला असल्याचे दिसत आहे.
इन्फो...
नगरसचिवांची कोंडी,
शिवसेना आणि भाजपाच्या वादात नगरसचिव राजू कुटे यांची मात्र कोंडी होत आहे. भाजपाच्या ज्या विद्यमान तीन सदस्यांची मुदत आणखी एक वर्षे शिल्लक आहे, त्यांनी राजीनामे दिले किंवा नाहीत याबाबत नगरसचिवंकडून सुधाकर बडगुजर यांनी लेखी पत्र घेतले आता शिवसेना गटनेत्यांनी नावे कशी दिली याबाबत सेनेचे गटनेत्यांनी कनिष्ठ लिपीक सचिन बोरसे यांनी बंद पत्राऐवजी खुले पत्र महासभेच्या वेळी आणून महापौरांना दिले अशी लेखी पत्र या प्रकरणात नगरसचिवांनी दिले आहे.