मनमाड : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी मनमाड शहर व भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, ओबीसी आघाडी अध्यक्ष गोविंद सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी जयकुमार फुलवाणी, सरचिटणीस एकनाथ बोडखे, सचिन संघवी, सचिन लुणावत, कांतीलाल लुणावत, उमाकांत राय, जलील अन्सारी, अमित गोगड, आनंद बोथरा, डॉ. सागर कोल्हे, सुनील पगारे, बुधणबाबा शेख, अकबर शहा, मकरंद कुलकर्णी, सचिन कांबळे, मूर्तिजा रस्सीवाला, नारायण जगताप, आशिष चावरीया, आनंद काकडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
------------------------
मनमाड येथे भाजपच्यावतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको प्रसंगी उपस्थित नितीन पांडे, जयकुमार फुलवाणी, गोविंद सानप, एकनाथ बोडखे, सचिन संघवी, सचिन लुणावत, कांतीलाल लुणावत, उमाकांत राय, आनंद बोथरा, डॉ. सागर कोल्हे आदी. (२७ मनमाड बीजेपी)
===Photopath===
260621\26nsk_6_26062021_13.jpg
===Caption===
२७ मनमाड बीजेपी