कळवण : महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही म्हणून निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे कळवण तालुका भाजपच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या पायरीवर आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी भाजप नेत्यांनी दिला आहे. यावेळी नायब तहसीलदार आर. एम. गांगुर्डे यांना भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार शहराध्यक्ष निंबा पगार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीपणाच्या परिणामी ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, असे नमूद करून ओबीसींचे राजकीय आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष प्रभाकर निकम, ज्येष्ठ नेते सुधाकर पगार, भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, डॉ. अनिल महाजन, गोविंद कोठावदे, हितेंद्र पगार, विश्वास पाटील, सचिन सोनवणे, काशीनाथ गुंजाळ, राजू पाटील, कृष्णकांत कमळासकर, रवींद्र पवार, किशोर तोटे, भूषण देसाई, नामदेव निकम, सोहम महाजन आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------
फोटो - ओबीसी आरक्षण निषेधासंदर्भात नायब तहसीलदार आर. एम. गांगुर्डे यांना निवेदन देताना विकास देशमुख, प्रभाकर निकम, सुधाकर पगार, दीपक खैरनार, निंबा पगार, डॉ. अनिल महाजन, गोविंद कोठावदे, हितेंद्र पगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते. (१५ कळवण ओबीसी)
-------------
देवळात निषेध आंदोलन
देवळा : देवळा तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी देवळा तहसीलदारांना निवेदन देऊन आघाडी शासनाचा निषेध केला. यावेळी भाजप नेते भाऊसाहेब पगार, जितेंद्र अहेर, किशोर चव्हाण, नारायण रणधीर, अतुल पवार, भाऊसाहेब आहेर, सोपान सोनवणे, प्रदीप आहेर, हर्षद मोरे, प्रकाश बच्छाव, दिनेश मोरे, समाधान मोरे, रवींद्र बागूल, दामोदर शिंदे, गौरव शिंदे, रोशन आहेर, तुषार आहेर, किशोर आहेर, मंगेश आहेर आदी उपस्थित होते.
देवळा तहसीलदारांना ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे अशा मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने देताना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाऊसाहेब पगार, जितेंद्र आहेर आदी. (१५ देवळा ओबीसी)
------------------------------
150921\15nsk_26_15092021_13.jpg
१५ कळवण ओबीसी