नाशिक : महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात भाजपचेच अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणिती वेगळीच झाली असून, स्थायी समितीतील भाजपचे सभापती उद्धव निमसे यांनी या समितीचे नियोजित हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर्तडक यांचे नाव जाहीर करून भाजपात सेनेला धक्का दिला आहे.स्थायी समितीची बैठक सभापती उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २८) समितीची बैठक झाली. यावेळी निमसे यांनी स्थायी समितीच्या सदस्यपदाची निवडणूक ही ३० दिवसांत झाली नाही तर ज्येष्ठत्वानुसार हंगामी सभापती निवड करता येते, असा दावा निमसे यांनी केला आणि त्या आधारे निवडही घोषित केली. यावेळी अशोक मुर्तडक यांचा पुष्पगुच्छ देऊन निमसे यांनी सत्कारही केला. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचा दावा निमसे यांनी केला.महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य नियुक्त करताना पक्षीय तौलनिक बळाच्या नियमांचा भंग करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.कायद्याच्या कसोटीवर टिकणे कठीणउद्धव निमसे यांनी त्यासाठी कायद्याचा अधिकार घेतला असला तरी महापालिका अधिनियमानुसार अशा प्रकारे परस्पर सभापती नियुक्त करण्याचा अधिकार नाही. काही कारणामुळे स्थायी समितीच्या सदस्यांमधून समितीची निवड होऊ शकली नाही तर ती महासभेत होते असे जाणकारांचे म्हणणे आहे. तर समितीचे सदस्य निवृत्त झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत सभापतीची निवड झाल्यास या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर जातो. परंतु त्याअगोदर हंगामी सभापती नियुक्त करण्याचे अधिकार स्थायी समितीला आहे. असा निमसे यांचा दावा आहे.
भाजपकडून मनसेचा सभापती घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:41 PM
महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात भाजपचेच अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणिती वेगळीच झाली असून, स्थायी समितीतील भाजपचे सभापती उद्धव निमसे यांनी या समितीचे नियोजित हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर्तडक यांचे नाव जाहीर करून भाजपात सेनेला धक्का दिला आहे.
ठळक मुद्देमहापालिकेत राजकीय नाट्य अंतर्गत वादामुळे निमसेंकडून मुर्तडकांना न्याय