नाशिक : संपूर्ण बहुमत असल्याने महापौरपदासाठी भाजपातच इच्छुकांची जोरदार स्पर्धा सुरू झाली असून, शुक्रवारी (दि.१५) अनेक इच्छुकांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेऊन व्यूहरचना सुरू केली आहे. दरम्यान, राज्यातील महाशिवआघाडीप्रमाणे नाशिकमध्येदेखील चर्चा सुरू असली तरी अद्याप मात्र स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी भाजपचे इच्छुक कामाला लागले आहेत. महापौरपदाचे दावेदार असलेल्या दिनकर पाटील, उद्धव निमसे आणि सतीश कुलकर्णी यांच्याबरोबर दिनकर आढाव, मुकेश शहाणे यांनीदेखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.परवानगीशिवाय अर्ज दाखल करण्यास मनाई४भाजपातील इच्छुकांची वाढीव संख्या बघता पक्षाने बंडखोरी टाळण्यासाठी काळजी घेतली जात असून, पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्याशिवाय कोणीही अर्ज दाखल करू नये, असे आदेशच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे वृत्त आहे.
उमेदवारीसाठी भाजप इच्छुकांची मुंबईवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:31 AM