लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंचवटीतील संजयनगरमधील बेपत्ता युवक जालिंधर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले (२३) याच्या खून प्रकरणातील प्रमुख संशयित तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सोमवारी (दि़ १०) फेटाळला़ सरकारी वकील अॅड़ कल्पक निंबाळकर व पोलीस अधिकारी यांनी न्यायालयात शेट्टी यांच्या जामिनास तीव्र विरोध केला़१ आॅक्टोबर २०१५ रोजीच्या रात्री नऊ वाजेपासून उगलमुगले बेपत्ता झाला होता़ त्याच्या नातेवाइकांनी याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती़ मात्र त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली़ त्यांच्या चौकशीत नगरसेवक शेट्टी यांच्या सांगण्यानुसार हा खून करण्यात आल्याचे समोर आले़ त्यानुसार पंचवटी पोलिसांनी शेट्टी यांना २६ रोजी अटक केली होती़ त्यानंतर पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली़ दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ज्वाल्या व शेट्टी यांच्यामध्ये बाचाबाची झाली व शेट्टींची गच्ची पकडण्यात आली होती़ या रागातून शेट्टी यांनी खून करण्यास सांगितल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले़
भाजपा नगरसेवक शेट्टींचा जामीन फेटाळला
By admin | Published: July 11, 2017 12:34 AM