लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सुमारे पावणे दोन वर्षांपासून बेपत्ता असलेला पंचवटीतील सराईत गुन्हेगार जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याचे अपहरण व खूनप्रकरणी पंचवटीतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हेमंत (अण्णा) शेट्टी, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व राकेश कोष्टी या तिघांना अटक करण्यात आली आहे़ या तिघांनाही शनिवारी (दि़२७) न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम़ के.पिंगळे यांनी १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़पंचवटीतील श्रीपाद सूर्यवंशी खुनातील संशयित ज्वाल्या हा १ आॅक्टोबर २०१५ पासून शहरातून बेपत्ता होता़ त्यास अखेरचे संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे यांच्यासोबत बघण्यात आले होते़ या दोघांना अटक करून पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ज्वाल्याला वाघाडी येथे नेऊन दारू पाजून टाकळी परिसरात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी व श्याम महाजन यांच्या ताब्यात दिल्याचे पोलिसांना सांगितले़ याप्रकरणी कौलकर व कडाळे या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी या खून प्रकरणात श्याम महाजन या आणखी एका संशयितास अटक करून सखोल तपास केला असता त्याने अपहृत ज्वाल्याचा परदेशी व कोष्टी यांच्या मदतीने खून करून इगतपुरी तालुक्यातील मौजे उभाडे या शिवारात मृतदेह नेला व पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली दिली आहे.या खून प्रकरणात भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा सहभाग पोलीस तपासात समोर आल्याने शुक्रवारी (दि़२६) रात्री पंचवटी पोलिसांनी शेट्टीला अटक केली़ तर सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व राकेश कोष्टी यांचा कारागृहाकडून ताबा घेण्यात आला आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी न्यायाधीशांना सांगितले की, ज्वाल्याचे अपहरण करण्यामागे संशयितांचा उद्देश, हत्येची सुपारी देण्यात आली का, पैशांचा काही व्यवहार होता का, गुन्ह्यातील हत्यार जप्त करणे बाकी असल्यामुळे या तिघांचीही सात दिवसांची पोलीस कोठडी केली़प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ तर संशयितांच्या वकिलांनी यातील एका संशयितास २९ पर्यंत पोलीस कोठडी असल्याने या तिघांनाही २९ पर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती़
भाजपा नगरसेवक शेट्टीसह तिघांना पोलीस कोठडी
By admin | Published: May 28, 2017 1:37 AM