नाशिक : महापालिकेतील भाजपमध्ये गटबाजी वाढत चालली असून त्यात श्रेष्ठींकडून ती मिटवण्याऐवजी तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नेत्यांना धडा शिकवण्यासाठी ब गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात बारा नगरसेवकांची नुकतीच बैठक झाली आता पुढील आठवड्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक नगरसेवकांचीदेखील बैठक होणार असून, एकूण २३ जण यात सामील होण्याची शक्यता आहे.महापालिकेत भाजपचे सध्या ६४ नगरसेवक आहेत. तथापि, सत्ता स्थापनेपासूनच नव्या जुन्यांचा वाद सुरू झाला होता. आयरामांना पदे मिळाल्याने निष्ठावान नाराज होते. त्यात आता महापौरपदानंतर स्थायी समिती सदस्य निवडीतही गटबाजी झाली. पक्षाच्या नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने सदस्य नियुक्त केले आणि सर्व घटकांना सामावून घेतले नाही. त्यातच आता तर सभापतिपदाच्या उमेदवाराचे नावदेखील पक्षनेत्यांनी अगोदरच निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या धर्तीवर लखोटा पद्धतीला विरोध वाढू लागला आहे. पक्षात सर्व अगोदरच आणि कोणाशीही चर्चा न करता ठरवले जात असेल तर मग नगरसेवक कशाला हवेत, आम्हाला गृहीत धरू नका असे सांगण्यास तयारी सुरू झाले आहे.पक्षातील अन्यायाचे कारण पुढे करून काही अन्य पक्षांतून आलेल्या नगरसेवकांनी आता फुटीची बिजे पेरली असून, ब गट स्थापन करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध भागांतील काही नगरसेवकांनी नुकतीच याबाबत बैठक घेतली. त्यानुसार ब गट स्थापण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.स्थायी समितीच्या वादाला भाजपाचे अंतर्गत गटबाजीची झळ असून, अलिकडेच झालेल्या महापौर निवडणूकीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही. ते असंतुष्ट देखील या गटात दाखल झाले आहेत. पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात तिढा सोडविण्याची गरज असली तरी अनेक नगरसेवकांची संघटनमंत्री व अन्य नेत्यांवर रोष आहे. स्थानिक भाजपानेते मात्र या वादापासून दूर राहत आहेत. त्यामुळे मनपाच्या अन्य निवडणुकीत यावादाचा फटका बसण्याची शक्यता आहे.कोणतेही पद स्वीकारता येणार नाहीब गट स्थापन करण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांचा सल्ला भाजप नगरसेवक घेत आहेत. ब गट स्थापन केल्यास नऊ महिने कोणत्याही समितीचे पद स्वीकारता येत नाही अशी तरतूद असल्याचे सांगितले जाते. मात्र, सदरचे नगरसेवक त्यासाठीदेखील तयार आहेत. कोणत्याही प्रकारचे पद मिळवण्यापेक्षा भाजपला दणका देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.माजी आमदार बाळासाहेब सानप यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने ते शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले असले तरी त्यांचे सुमारे दहा समर्थक नगरसेवक भाजपत आहेत. परंतु तेही आता ब गट स्थापन करणाऱ्यांना मिळणार असून पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
भाजप नगरसेवकांत फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:44 PM
महापालिकेतील भाजपमध्ये गटबाजी वाढत चालली असून त्यात श्रेष्ठींकडून ती मिटवण्याऐवजी तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नेत्यांना धडा शिकवण्यासाठी ब गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात बारा नगरसेवकांची नुकतीच बैठक झाली आता पुढील आठवड्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक नगरसेवकांचीदेखील बैठक होणार असून, एकूण २३ जण यात सामील होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देविधीज्ञांचा सल्ला : ‘ब’ गट स्थापण्याच्या हालचाली सुरू