शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
2
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
3
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
4
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
5
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
6
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
7
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
8
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
9
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
10
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
11
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
12
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
13
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
14
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
15
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
16
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
17
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
18
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
19
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

करवसुली न करण्याची भाजयुमोची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:36 PM

त्र्यंबकेश्वर : शहराचे अर्थचक्र त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबून असून मंदिरच बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत.

ठळक मुद्देपालिकेने नोटिसा बजावून व्याज व दंडासह वसुली केली होती.

त्र्यंबकेश्वर : शहराचे अर्थचक्र त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबून असून मंदिरच बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने एकत्रित करवसुली, पाणीपट्टी व पालिका गाळेभाडे वसुली यावर्षी करु नये, अशा आशयाचे निवेदन त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने मुख्याधिकारी संजय जाधव यांना देण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष समीर पाटणकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्यासह युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज मुळे, संकेत टोके, जयदीप शिखरे, ओंकार कचोळे, निलेश पवार, सागर सोनार, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मागच्या वर्षी देखील नगरसेवकांनी एकमताने लॉकडाऊनमध्ये दलित आदिवासी हातावर पोट भरणारे व्यावसायिक यांच्याकडून पालिकेने कर वसूल करु नये, असा प्रस्ताव दिला होता. तरीही जानेवारीपासूनच पालिकेने नोटिसा बजावून व्याज व दंडासह वसुली केली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

टॅग्स :talukaतालुकाcorona virusकोरोना वायरस बातम्या