पंचवटी : मेरी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला भाजपाचा जुगारी नगरसेवक हेमंत शेट्टी हा शुक्रवारी (दि़२३) पंचवटी पोलिसांना शरण आला़ त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली़मेरीच्या मोकळ्या मैदानात जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना मिळाली होती़ त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी छापा टाकून संशयित जमीर शेख, कुणाल पाटील, रमीज शेख, योगेश आव्हाड, संभाजी कदम हे जुगारी ५२ पानी पत्त्यांच्या कॅटवर पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळताना आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली, तर नगरसेवक हेमंत शेट्टी,भरत पुराणिक ऊर्फ डागन, सचिन पाटील ऊर्फ जॅक हे संरक्षक भिंतीवरून उड्या मारून फरार झाले होते.दरम्यान, गत १२ नोव्हेंबरपासून फरार असलेल्या नगरसेवक शेट्टी यास पकडण्यात ना गुन्हे शोध पथकाला यश आले ना पंचवटी पोलिसांना़ दरम्यानच्या कालावधी हा त्यास जामिनासाठी दिला की काय याबाबत शंका निर्माण केली जाते आहे़ शुक्रवारी (दि़२३) दुपारी पावणेतीन वाजता हेमंत शेट्टी पंचवटी पोलिसांना शरण आला़ यानंतर गुन्हे शोध पथकाने अतितत्परता दाखवून त्यास न्यायालयातही हजर केले़
भाजपा जुगारी नगरसेवक शेट्टी पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:44 AM
मेरी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला भाजपाचा जुगारी नगरसेवक हेमंत शेट्टी हा शुक्रवारी (दि़२३) पंचवटी पोलिसांना शरण आला़ त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली़
ठळक मुद्देजुगार अड्ड्यावर छापा : जामिनावर मुक्तता