शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

भाजपा सेनेशी दोन हात करण्यास उत्सुक

By admin | Published: January 14, 2016 12:12 AM

पालिका निवडणुकीचे पडघम : शंभर जागा मिळवण्यासाठी राबवणार मोहीम

नाशिक : राज्यात सत्ता असल्यानंतरही धुसफूस असलेल्या भाजपा आणि शिवसेनेत पालिका निवडणुकीतही सामना रंगणार आहे. वर्षभराने होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय स्थानिक स्तरावर जाहीर केला असून, आता स्पर्धक कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे नाहीच तर शिवसेना असणार आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आता संघटनात्मक निवडणुका पार पडताच पालिकेची शंभरहून अधिक जागा मिळवण्यासाठी हन्रेड प्लस मोहीमच राबविण्यात येणार आहे.भाजपाच्या वतीने सध्या संघटनात्मक निवडणुका सुरू असून, मंगळवारी मध्य पश्चिम मंडल अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी ही माहिती देण्यात आली. सध्या पक्षाला चांगले दिवस असून, अन्य पक्षांतील अनेक जण पक्षात येत आहेत, असे सांगतानाच आता भाजपाचे लक्ष्य महापालिका निवडणुका असून, यंदा भाजपा कोणाशीही युती न करता निवडणूक लढवेल, असे माजी शहराध्यक्ष विजय साने यांनी सांगितले, तर प्रदेश प्रवक्ता सुहास फरांदे यांनी यंदा महापालिका निवडणुकीत भाजपाची स्पर्धा कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेशी नसून थेट शिवसेनेशीच असणार असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता येत असताना महापालिकेत स्वबळावर सत्ता का येऊ शकत नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांना केला. गुजरातमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपाला शंभरहून अधिक जागा मिळतात. अवघ्या आठ ते दहा जागा विरोधकांना मिळतात. मग, महाराष्ट्रात आणि विशेष करून नाशिकमध्ये भाजपाला ते का शक्य होऊ शकत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपाने या अगोदरच संघटनात्मक बांधणी केली असून, त्या अनुषंगाने ‘हंड्रेड प्लस’ म्हणजेच शंभरहून अधिक जागा मिळवण्याचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता राज्यात सत्तेवर असतानादेखील एकमेकांच्या विरोधात सुंदोपसुंदी करणाऱ्या मित्रपक्षांमध्येच नाशिकमध्ये लढत होईल, असे दिसत आहे. (प्रतिनिधी)