इगतपुरी : राज्यात महिलांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात व महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे बनविण्यात यावे, याकरिता भाजपा महिला मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.तशातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व दवाखान्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडत असून, महिलांवर होणार्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे बनविण्यात यावे व अत्याच्यार करणार्यांवरकडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपा जिल्हा सरचिटणीस वैशाली आडके, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष आशा थोरात, सुनीता पासलकर, संगिता दगडे, अपर्णा पाटील, प्रीती पिंपळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.